चीनमध्ये कोरोनाची दुसरी लाट, बीजिंगमध्ये 5 लाख लोक घरात डांबले

चीन आता कोरोना विषाणूच्या संसर्गाचा दुसरा टप्पा लपविण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना विषाणूमुळे बाधीत असलेल्या राजधानी बीजिंगमध्ये आजही सुमारे पाच लाख लोक घरात डांबले आहेत. चीनच्या सरकारने इशारा दिला आहे की, राजधानीच्या आसपास असलेल्या या भागात कोरोना विषाणूच्या संसर्गाची स्थिती अद्याप गंभीर आहे. विविध वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीजिंगपासून दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या अंशिन काउंटी भागाला सील करण्यात आले आहे.

तपासणी दरम्यान, आरोग्य अधिका-यांना कोरोना विषाणूची काही नवीन क्लस्टर्स आढळली आहेत. वुहानमध्येही संसर्ग झाला तेव्हा अशीच स्थिती दिसली होती, असे सांगितले जात आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या दुसर्‍या टप्प्यात आतापर्यंत चीनमध्ये अधिकृतरित्या 311 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, बीजिंगमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेली सतर्कता आता कमी करता येतो. असे असले तरी, घाऊक बाजार आणि सार्वजनिक वाहतूक अद्याप बंद ठेवण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या