सिंधू चीन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल

सामना ऑनलाईन । फूझॉ

चीन ओपन सुपर सीरिज प्रीमिअर बॅडमिंटन स्पर्धेत हिंदुस्थानचे इतर खेळाडू अपयशी ठरले असतानाच पी. व्ही. सिंधू उपांत्यपूर्व फेरीत धडकली आहे. सिंधूने चीनच्या १७ वर्षीय हान यूचा २१-१५, २१-१३ असा पराभव करुन उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या सिंधूने अनुभवाच्या जोरावर हानवर मात केली. क्रमवारीत १०५व्या स्थानी असलेल्या हानने सुरुवातीला चांगली टक्कर दिली. मात्र सिंधूने आक्रमक खेळ करुन बाजी मारली.

दरम्यान, सायना नेहवाल आणि एच. एस. प्रणॉय यांच्या पदरी आज अपयश पडले. सायनाला जपानच्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला तर प्रणॉयचा चेक यू लीने पराभव केला.

आपली प्रतिक्रिया द्या