जगभरात कोरोना लसीची प्रतीक्षा; चीनमध्ये सैनिकांना दिली कोरोनाची लस

794

कोरोनाच्या जागतिक संकटाला थोपवण्यासाठी लसीची प्रतीक्षा आहे. रशियाची जगातील पहिली कोरोनाची लस बुधवारी येत आहे. मात्र, चीनमध्ये तयार झालेल्या लसीची तिसरी चाचणी होण्यापूर्वीच आणि त्याला मान्यता मिळण्यापूर्वीच चीनच्या सैनिकांना कोरोना लस देण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. कोरोनाची लस आल्यानंतर प्रथम आरोग्य सेवकांना लस देण्याचा प्रत्येक देशाचा प्रयत्न आहे. मात्र, चीनमध्ये आरोग्य सेवकांऐवजी सैनिकांना लस देण्यात येत आहे. या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी होत आहे. त्याचे निष्कर्ष येण्याआधीच ही लस सैनिकांना देण्यात येत आहे.

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या काळात सैन्याचे महत्त्व वाढले आहे. त्यांनी चीनी नागरिक आणि सैनिक यांच्यातील समन्वय वाढवण्यावर भर दिला आहे. चीनच्या सैनिकांमध्ये संसर्गजन्य रोगाविरोधात लढण्याची रोगप्रतिकारशक्ती आणि जैविक शक्ती चांगली असल्याने या लसीची दोन टप्प्यात चाचणी झाल्यानंतर आता सैनिकांना देण्यात येत असल्याचे चीनचे पॉलीसी सेंटरचे संचालक एडम नी यांनी सांगितले. कॅनसियो ही कोरोनाविरोधातील लस चीनच्या लष्कराच्या मदतीने बनवण्यात आली आहे. ही लस बनवण्यात चीनच्या लष्कारीतल वैद्यकीय पथकाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे सैनिकांना ही लस प्रथम देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

चीनमधील अनेक लसी याआधी यशस्वी झाल्या आहेत. इबोलाची लस बनवणाऱ्या डॉ. चेन वेई यांचा ही लस बनवण्यात सहभाग आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 21 पैकी 8 लसी चीनमधील आहेत. मात्र, चीनमध्ये कोरोनाची लस प्रायोगित तत्वावर असताना सैनिकांना देण्यात येत असल्याने अनेक सवाल उपस्थित होत आहेत. मात्र, चीनच्या सैनिकांच्या रोगप्रतिकारशक्तीमुळेच लसीची चाचणी त्यांच्यावर करण्यात येत असल्याचे पॉलीस सेंचरकडून सांगण्यात आले. ही लस अयशस्वी झाली तरी त्याची माहिती बाहेर येऊ नये, या हेतूनही चीन सैनिकांना लस देत असल्याची चर्चा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या