जिनपिंग यांच्यावर टीका करणाऱ्या उद्योजकाला 18 वर्षे तुरुंगवास

कोरोनाविरुद्धच्या उपाययोजना आणि त्यासंदर्भातील निर्णयांवरुन चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावर सार्वजनिकरित्या टीका करणाऱ्या चीनमधील एका बड्या उद्योजकाला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारी रियल इस्टेट कंपनीचे माजी अध्यक्ष रेन झिकियांग यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप ठेवत त्यांना करोडो डॉलर्सची लाच घेतल्याचा आरोपही ठेवण्यात आला आहे.

न्यायाधिशांनी झिकियांग यांना 18 वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावण्याबरोबरच सहा लाख 20 हजार डॉलरचा दंडही ठोठावला आहे. ही कारवाई करण्याआधी चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने झिकियांग यांची पक्षामधून हकालपट्टी केली होती. विशेष म्हणजे कोरोना महामारीत जनतेचे हित संभाळण्यात शी जिनपिंग यांना अपयश आल्याची टीका केल्यानंतर झिकियांग हे सार्वजनिक ठिकाणी फारसे दिसले नाहीत आणि आता त्यांना दिलेल्या शिक्षेची बातमी उघड झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या