लाल माकडांचा खोटेपणा, चिनी हवाईदलाच्या व्हिडीओमध्ये हॉलीवूडच्या क्लिप्स

चीनने आपल्या हवाईदलाची ताकद दाखविण्यासाठी हॉलीवूडचे ब्लॉकबस्टर चित्रपट ‘ट्रान्स्फॉर्मर’, ‘द रॉक’ यांतील व्हिडीओ क्लिप्सचा वापर केला आहे. लाल माकडांच्या या खोट्या प्रचाराची टिंगल सोशल मीडियावर उडविली जात आहे.

व्हिडीओला 40 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज् मिळत आहेत. यात चिनी एअर फोर्सची ‘एच-6’ बॉम्बर विमाने दाखविण्यात आली आहेत. या व्हिडीओमध्ये चिनी पायलट अमेरिकेच्या दिएगो गायसिया आणि गुआम हवाईतळांवर बॉम्ब हल्ले करताना दाखविला आहे. ‘ट्रान्स्फॉर्मर’, ‘द रॉक’ आणि ‘हार्ट लॉकर’ या चित्रपटांमधील हे थरारक व्हिडीओ आहेत. चीनचा खेटेपणा युजर्सनी उघडकीस आणला. ‘हॉलीवूडचा आधार घेण्यापेक्षा स्वत:चे एअर फोर्स दाखवा,’ असे युजर्सनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या