चीनने सीमारेषेजवळ डागली क्षेपणास्त्रे; युद्धसरावातून दबाव वाढवण्याचा प्रयत्न

लडाखमध्ये चीनच्या सीमारेषजवळ तणाव कायम आहे. तणाव कमी करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. त्यातच चीनच्या सैन्याने हिंदुस्थानवर दबाव वाढवण्यासाठी सीमारेषजवळ युद्धसराव केला आहे. या युद्धसरावादरम्यान 90 टक्के नव्याने विकसीत आणि अद्ययावत शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात आल्याचा दावा चीनची सरकारी वृत्तसंस्था ग्लोबल टाईम्सने केला आहे. चीन विविध मार्गांनी हिंदुस्थानवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, चीनच्या प्रत्येक कुरापतींना हिंदुस्थानकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

4700 मीटर उंचीवर चीनच्या पीएलए सैन्याच्या तिबेट थिएटर कमांडक़डून हा युद्ध्याभ्यास करण्यात आला. या युद्धसरावाचा एक व्हिडीओही ग्लोबल टाईम्सने जारी केला आहे. रात्रीच्या अंधारात ड्रोन विमानांच्या मदतीने चीनचै सैन्य हल्ल्याचा सराव करत असताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. चिनी सैन्याने रॉकेट आणि क्षेपणास्त्र डागत संपूर्ण पहाड उद्ध्वस्त केल्याचे व्हिडीओत दिसत आहे. यावेळी चीनच्या सैन्याने गाइडेड मिसाइल हल्ल्याचा सरावही केला. तसेच तोफा आणि खाद्यांवर ठेवून डागण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्रांची प्रात्यक्षिकेही यावेळी करण्यात आली. या युद्धसरावत नव्याने विकसीत केलेली आणि अत्याधुनीक 90 टक्के क्षेपणास्त्रे असल्याचा दावा ग्लोबल टाईम्सने केला आहे.

हिंदुस्थान-चीनमध्ये तणाव निवळण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेत हिंदुस्थानवर दबाव टाकण्यासाठी चीनने हा युद्धसराव केल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यासाठी ग्लोबल टाइम्सने याबाबतचे वृत्त आणि व्हिडीओ जारी केला आहे. चर्चेदरम्यान चीनने मान्य केलेल्या गोष्टी प्रत्याक्षात आणलेल्या नाहीत. त्यांचे सैन्य अद्याप माघारी गेलेले नाही. चीनच्या या वागणुकीमुळे दोन्ही देशाच्या संबंधात तणाव निर्माण झाल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या