चीनने बनवले सर्वात लांब नूडल्स

79

सामना ऑनलाईन । चीन

नूडल्स म्हटले की काही लोकांच्या तोंडाला पाणी सुटते. पण जर तुम्हाला ३,०८४ मीटर इतके लांब नूडल्स खायला दिले तर ती खाताना नक्कीच तुमची तारांबळ उडेल. हे नूडल्स एका चायनिज कंपनीने बनवले असून त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या नूडल्सची लांबी तब्बल ३,०८४ मीटर इतकी असून त्याला मोजण्यासाठी तीन तास इतका कालावधी लागला.

हे नूडल्स बनवण्यासाठी ४० किलो ब्रेडचे पीठ, २८ लीटर पाणी, अर्धा किलो मीठ एवढे सामान लागले. १७ तासाच्या अथक प्रयत्नानंतर हे नूडल्स बनवण्यास कंपनीच्या कर्मचाऱ्यांना यश आले. नूडल्स बनवल्यानंतर त्याला लसूण, अंडी, टोमॅटो सॉसमध्ये शिजवून ते ४०० कर्मचाऱ्यांना खायला देण्यात आले. या आधी सर्वात लांब नूडल्स बनवण्याचा रेकॉर्ड जपानच्या नावे होता. त्यांची लांबी ५४८.७ मीटर इतकी होती.

पाहा व्हिडिओ –

आपली प्रतिक्रिया द्या