एअरपोर्टवर जोडप्याच्या बॅगेत सापडली २०० जिवंत झुरळं

52

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

एखादं झुरळ दिसलं तरी कित्येकांची घाबरून पळापळ सुरू होते. मात्र चीनमधील एका एअरपोर्टवर एक विचित्र घटना समोर आली आहे. एका प्रवाशी जोडप्याच्या बॅगेत जवळपास २०० हून अधिक जिवंत झुरळं सापडल्याची घटना घडली आहे. बॅगेमध्ये इतक्या मोठ्या संख्येने झुरळं पाहिल्यानंतर एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांनाही धक्काच बसला.

ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गुआंग्डोंग प्रांतातील बैयुन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांनी एक्स-रे मशिनने एका जोडप्याच्या बॅगेची तपासणी केली. तेव्हा त्यांच्या बॅगेत त्यांना झुरळं दिसली. त्यावेळी ती बॅग उघडून पाहिली असता त्यात जवळपास २०० हून अधिक झुरळं सापडली. इतक्या मोठ्या प्रमाणात जिवंत झुरळं पाहिल्यानंतर वृध्द जोडप्याला त्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी आपल्या पत्नीला त्वचेसंबंधित काही आजार असून घरगुती उपचारासाठी ती आणली असल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. काही औषधी क्रिममध्ये झुरळं मिक्स करून ते उपचारासाठी वापरलं जातं असं ही त्याने सांगितलं. मात्र विमानातून झुरळं नेण्यास परवानगी नसल्याने त्या जोडप्याला त्या झुरळांना सोडून द्यावं लागलं.

आपली प्रतिक्रिया द्या