मुस्लिमांना हॉटेलमध्ये प्रवेश द्याल तर दंड भरावा लागले!

37

सामना ऑनलाईन । बीजिंग

चीनमध्ये मुस्लिमविरोधाने टोकाचे पाऊल गाठले आहे. चीनच्या शिनझियांग प्रांतातील उइगर मुस्लिमांविरोधात सरकारने आणखी एक कठोर नियम बनवला आहे. देशभरातील हॉटेलमध्ये शिजझियांग प्रांतात राहणाऱ्या उइगर मुस्लिमांना राहण्याची सुविधा देण्यास बंदी घालण्यात आली आहे. सरकारी नियम तोडणाऱ्याला चीन प्रशासन दंडाची शिक्षा करणार आहे.

शिजझियांग प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणात उइगर मुस्लिम राहतात. उइगर मुस्लिम देशामध्ये दहशतवाद आणि कट्टरतेला पाठिंबा देतात असा आरोप चीन सरकारने केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर सरकारने निर्बंध लादण्यास सुरुवात केली. रेडिओ फ्री एशियाने दिलेल्या माहितीनुसार, शिजझियांग प्रांतातील उइगर मुस्लिमांना हॉटेलमध्ये थांबण्याची परवानगी दिल्यास कारवाईचा सामना करावा लागणार आहे. नियम तोडल्यास हॉटेलला १५ हजार युआन (चिनी चलन) किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे.

याआधीही चीन सरकारने मुस्लिमविरोधातून कडक नियम केले होते. काही दिवसांपूर्वी चीन सरकारने मुस्लिमविरोधातून नमाज पढण्यासाठी वापरायची चटई आणि कुराण या धार्मिक वस्तू सरकारकडे जमा करा असा आदेश काढला होता. तसेच मुस्लिमांना लांब दाढी ठेवण्यास आणि रमजानच्या पवित्र महिन्यात रोजा ठेवण्यास बंदी घालण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या