चिनी मोबाईल कंपनीची हेराफेरी, एकाच IMEI नंबरचे 13 हजार 500 फोन

932
mobile-phone

एका चिनी मोबाईल कंपनीने एकाच IMEI नंबरचे 13 हजार 500 फोन बनवल्याचं उघड झालं आहे. मेरठ पोलिसांमुळे ही घटना उजेडात आली आहे. मेरठ पोलिसांनी या प्रकरणी मोबाईल कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मेरठच्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा फोन बिघडला होता. सर्व्हिस सेंटरने दुरुस्ती करूनही त्यात विशेष फरक पडला नव्हता. त्याने एक पर्याय म्हणून त्याचा फोन पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे तपासणीसाठी दिला होता. त्याचा फोन तपासला असता सायबर गुन्हे शाखेला त्याच्याच IMEI नंबरचे देशभरात 13,500 मोबाईल फोन कार्यरत असल्याची माहिती मिळाली.

हे एक गंभीर प्रकरण असल्याचं मेरठ पोलिसांचं म्हणणं आहे. IMEI नंबर म्हणजे इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेन्टिटी नंबर हा 15 अंकी क्रमांक प्रत्येक मोबाईल उपकरणाला दिलेला असतो. तो जगातील एकमेव क्रमांक असावा असा नियम आहे. या नंबरवरून मोबाईल उत्पादक कंपनी, त्याचं मॉडेल आणि तत्सम माहिती मिळते. पोलिसांना हा क्रमांक सीडीआर किंवा फोन ट्रॅकिंगसाठी उपयोगी पडतो. मात्र, एकाच IMEI क्रमांकाचे इतके मोबाईल सापडल्याने यात काहीतरी षडयंत्र असावं असा पोलिसांचा अंदाज आहे.

आपली प्रतिक्रिया द्या