चायनिज पास्ता

चायनिज, पास्ता आणि चीझ या तीनही गोष्टी लहान मुलांच्या आवडीच्या असतात. जर या तीनही गोष्टि एकत्र करुन दिल्या तर नक्कीच ते कुठलीही नाटकं न करता आवडीने खातील. खास बच्चे कंपनीसाठीच हा चीझीलिशियस चायनिज पास्ता. फक्त बच्चे कंपनीसाठी बनवताना चीली सॉसचे प्रमाण कमी वापरावे.

साहित्य –  शिजवलेला मॅक्रोनी पास्ता, उभा चिरलेला कोबी, शिमला मिरची, किसलेले गाजर, बारिक चिरलेली कांद्याची पात, आलं लसून पेस्ट, सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस, चीझ, मीठ, तेल

कृती – कढईत तेल गरम करुन त्यात आलं लसून पेस्ट टाकावी. त्यात कांद्याच्या पातीतील कांदा बारिक चिरुन टाकावा. दोन्ही व्यवस्थित परतले की त्यात कांद्याची पात सोडून सर्व भाज्या घालाव्यात. भाज्या चांगल्या परतल्या की त्यात सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस टाकावा. भाज्या सॉसमध्ये पाच मिनीटे शिजू द्याव्या. नंतर त्यात किसलेले चिझ आणि शिजलवलेला पास्ता टाकावा. व्यवस्थित परतून घ्यावे. झाकण ठेवून पाच मिनीटे शिजू द्यावे. सर्व्ह करताना पुन्हा वरुन चीझ किसून टाकावे.