हिंदुस्थानच्या हद्दीत चिनी सैनिक, सुरक्षा यंत्रणांनी घेतलं ताब्यात

प्रातिनिधीक फोटो

हिंदुस्थान-चीन सीमेवर तणाव कायम आहे. गोळीबार, मॉर्टर डागणे, घुसखोरीचे प्रयत्न वाढले आहेत. त्यामुळे दोन्ही देशातील वातावरण तंग आहे. असे असतानाच एक चिनी सैनिक हिंदुस्थानच्या हद्दीत शिरल्याचे समोर आले आहे. सुरक्षा यंत्रणांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लढाख मधील चुमार-डेमचोक भागात गस्तीवर असलेल्या सुरक्षा यंत्रणांना एक चीनी सैनिक दिसला. त्याला त्यांनी ताब्यात घेतले आहे. चौकशी सुरू असून तो अनवधानाने हिंदुस्थानच्या हद्दीत शिरल्याचे कळते आहे. चौकशीनंतर त्या दोन्ही देशांतील प्रोटोकॉलनंतर चीनकडे सोपवण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एएनआयने आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या