…म्हणून ‘या’ देशातील महिला पतीला खाऊ घालताहेत नपुंसक बनवणारं औषध, धक्कादायक खुलासा

कोणत्याच महिलेला आपल्या प्रियकराने किंवा पतीने आपल्याशिवय दुसऱ्या महिलेकडे पाहूच नये असे वाटत असते. यासाठी महिला वेगवेगळा हातखंडाही वापरत असतात. मात्र चीनमधील महिला यासाठी वेगळाच उपाय करत असून वाचून तुम्हीही हैराण व्हाल.

‘ग्लोबल टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, पती आपल्याला धोका देऊ नये यासाठी महिला त्यांना एक औषध देत आहे. हे औषध पुरुषाला नपुंसक बनवते. मात्र चीनमधील महिला आपल्या पतीला गुपचूप हे औषध देत आहेत. पती नपुंसक व्हावा आणि त्याने दुसऱ्या महिलेकडे आकर्षित होऊ नये, यासाठी महिला हे औषध देत असल्याचा खुलासा वृत्तात करण्यात आला आहे.

चीनमधील महिला पतीला डायथायलस्टीलबेस्ट्रोल हे औषध खाऊ घालत आहे. हे औषध पुरुषांना उत्तेजीत होण्यापासून रोखते. याबाबत सोशल मीडियावर अनेक कथाही वाचायला मिळत आहेत, असेही वृत्तात म्हटले आहे.

याबाबत ‘वी चॅट’वर (WeChat) एक लेखही प्रसिद्ध झाला आहे. काही महिलांनी ऑनलाईन पद्धतीने हे औषध मागवले आणि गुपचूपपणे जेवणात किंवा ज्यूसमध्ये टाकून पतीला दिले. यामुळे त्यांच्या पतींनी त्यांना धोका देणे बंद केले. यावर अनेक महिलांनी फिडबॅकही दिला असून हे औषध धोकेबाज पतींसाठी उपयुक्त असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, लेख व्हायरल झाल्यानंतर ऑनलाईन विक्री प्लॅटफॉर्मवरून हे औषध गायब झाले आहे. याबाबत चीनमधील कायदेतज्ज्ञांनी देखील महिलांना ताकिद दिली असून पतीला शारिरीक त्रास झाल्यास कायद्यानुसार कारवाई करण्याचा येईल. तसेच ऑनलाईन औषध विक्री करणाऱ्यांवरही कारवाई करण्याचा आणि लायसन्स रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या