स्वदेशी ‘चिंगारी’चा भडका, तासाला लाखो डाऊनलोड

1704

हिंदुस्थान सरकारने सुमारे 59 चिनी ऍपवर बंदी घातली आहे. यामध्ये ‘टिकटॉक’ या  सर्वाधिक लोकप्रिय ऍपचाही समावेश आहे. टिकटॉक ऍप बंद झाल्याकर त्याला पर्याय असलेल्या स्वदेशी ‘चिंगारी’ ऍपकडे सर्वांचे लक्ष गेले आहे. हा ऍप दर तासाला तब्बल लाखोंच्या संख्येने डाऊनलोड होत आहे. टिकटॉकला स्वदेशी पर्याय म्हणून आता ’चिंगारी’ ऍपकडे बघितले जात आहे. गेल्या 72 तासांत सुमारे पाच लाखांहून अधिक जणांनी हे ऍप डाऊनलोड केले आहे. लवकरच ’चिंगारी’च्या डाऊनलोडचा आकडा 10 लाखांच्या आसपास जाईल.

चिंगारी ऍपचे सहसंस्थापक सुमित घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार, ’चिंगारी’वर छोटे व्हिडिओ तयार करता येतात. त्यामुळे याची लोकप्रियता काढत आहे. अचानक डाऊनलोडिंगमध्ये वाढ झाल्याने ऍपचे सर्व्हर डाऊन झाले असून आम्ही त्यावर काम करत आहोत. लोकांनी त्यामुळे थोडा धीर धरावा.

यू टय़ूब शोधतोय पर्याय

टिकटॉकबंदीनंतर युजर्सला शॉर्ट व्हिडीओ बनवता येईल, असा पर्याय यू टय़ूब शोधत आहे. यू टय़ूब काही दिवसांपासून एका नव्या फिचरवर चाचणी घेत आहे. हे नवे फिचर यू टय़ूब मोबाईल ऍपसाठी असेल, त्यावर युजर्स टिकटॉकप्रमाणे 15 सेकंदांचा छोटा व्हिडीओ बनवून अपलोड करू शकतात. सुरुवातीला काही मोजक्याच युजर्ससाठी हा फीचर उपलब्ध असेल. टेस्टिंग संपल्यावर ते सर्वांना डाऊनलोड करता येईल.

‘कॅम स्कॅनर’ऐवजी काय वापराल

‘कॅम स्कॅनर’ऐवजी ऍडोब स्कॅन ऍप वापरू शकतो. मायक्रोसॉफ्ट ऑफिस लेन्स ऍपच्या मदतीने महत्त्वाची कागदपत्रे स्कॅन करू शकतो. ‘कॅम स्कॅनर’ला गुगल ड्राईव्ह चांगला पर्याय आहे. क्लीन स्कॅनमध्येही कॅम स्कॅनरसारखी फीचर्स आहेत. तसेच स्कॅनर ऍप या अमेरिकन ऍपचा वापरू शकता.

आपली प्रतिक्रिया द्या