…आणि तो बनला १०० मुलांचा पिता

20

सुरज पांडे । मुंबई

फिल्म अभिनेते मेहमुद यांचा कुवारा बाप आठवतो का? अशीच काहीशी कथा आहे, अरना फाऊंनडेशनच्या चिनू कावत्रा यांची. रस्ता साफ करता करता अनाथांचे दुख: ही साफ करायला ते निघाले. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर साफ-सफाई करण्याचे काम सध्या अरना फाऊंडेशनने हाती घेतले आहे. तसेच मुंबई ते ठाणे मार्गात फुटपाथवर जगणाऱ्या अनाथ मुलांना आधार देण्याच काम कुवारा बाप करतो आहे.

चिनू कावत्रा हे अरना फाऊंनडेशनचे सह संस्थापक आहे. त्यांनी मागील काही महिन्यांपासून समुद्र सफाईचे काम हाती घेतले आहे. ज्यामध्ये या संस्थेतर्फ दादर चौपाटीची स्वच्छता करण्यात येत आहे. यासोबतच, चिनू जवळपास १०० गरीब व अनाथ मुलांना रोटीघर योजनेअंतर्गत दररोज जेवण देतो. ही योजना मागील १९५ दिवस अखंड चालू आहे. या सोबतच, लहान मुलांचे बालपण त्यांना पुन्हा मिळावे यासाठी संस्था विविध प्रयत्न करत आहे. याच अनुशंघाने संस्थेमार्फत एक शाळा दत्तक घेण्यात आली आहे. ज्यामध्ये ४०० पेक्षा अधिक गरीब व अनाथ विद्यार्थी येथे शिकतील. ठाणे येथे जे. एम. इंग्लिश स्कुल दत्तक घेऊन ‘अरना इंग्लिश स्कुल’ असे त्यांचे नाव ठेवले आहे. तसेच या शाळेला आर्थिक साहाय्य मिळावे म्हणून त्यांनी लोकांना आवाहन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या