चिपळूणात घरात पाणी शिरले, राजापूरात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

329

दिवसभर कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे राजापूरातील अर्जुना आणि कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. राजापूरातील चिचंबांध परिसर जलमय झाला आहे.चिपळूण शहरालाही पावसाने झोडपले. आज परशुराम नगर येथील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते.

मामा नरलकर,अरविंद नरलकर, सुनीता नरलकर, किर्दवकर,तासे, राजन मेहता यांच्या घरामध्ये पाणी शिरले. यावेळी नगर परिषद सफाई कामगारांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन साफसफाई केली.नगरसेवक शशिकांत मोदी यांनी चेतक कंपनी यांना सांगून जेसीबी उपलब्ध करून दिला. पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांचे नुकसान झालं असून तहसिल कार्यालय यांनी पंचनामा करावा अशी मागणी नगरसेवक शशिकांत मोदी यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या