प्रश्नपत्रिकांचे खुलेआम वितरण, शिक्षण विभागाचा अजब कारभार

31

सामना ऑनलाईन, चिपळूण

येथील पंचायत समिती शिक्षण विभागाचा अजब कारभार निदर्शनास आला. ७ एप्रिल पासून जिल्हापरिषद शाळांच्या वार्षिक परीक्षांच्या पार्श्वभूमीवर येथील पंचायत समिती शिक्षण विभागकडून तालुक्यातील जिल्हापरिषद शाळांच्या संबधीत शिक्षकांना १ ली ते ८ वीच्या प्रश्नपत्रिकांचे वितरण सुरु होते.शाळा कोणत्याही असोत वा इयता कोणत्याही असोत प्रश्नपत्रिकांचे वितरण गोपनीय व बंद खोलीत अथवा एखाद्या सभागृहात केले जाते मात्र येथील शिक्षकांना प्रश्नपत्रिकांचे वितरण पंचायत समिती आवरातील दत्तमंदिराच्या खुल्या सभागृहात सुरु होते.

पंचायत समिती कार्यलयात तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून ग्रामीण भागातून लोक येत असतात मात्र त्यामुळे उत्सुकतेपोटी एखाद्या व्यक्तीने प्रश्नपत्रिका हाताळल्यास पेपरफुटी सारखे गंभीर प्रकरण घडू शकते मात्र ह्याची कोणतीही भीती न बाळगता खुलेआम प्रश्नपत्रिकांचे वितरण सुरु होते.याबबत वितरण करणाऱ्या व प्रश्नपत्रिका घेणार्या संबधीत शिक्षकांना विचारणा केली असता गटशिक्षण अधिकारी श्रीधर शिगवण ह्यांच्या आदेशानुसार प्रश्नपत्रिकांचे वितरण सुरु असल्याचे काही शिक्षकांनी सांगितले.

शिक्षकांच्या माहितीनुसार गटशिक्षण अधिकारी शिगवण ह्यांना विचारले असता ह्यात कोणतीही गोपनीयता नसते त्यामुळे खुलेआम वाटप झाली तरी त्यात भीती काय बाळगायची असे बेजाबदार उत्तर देण्यात आले.सध्या राज्यात अनेक ठिकाणी अनेक परीक्षांचे पेपर फुटी प्रकरणे गाजत असताना जिल्हा परिषद शाळांच्या परीक्षांचे गांभीर्य न घेणऱया गट शिक्षण अधिकारी शिगवण ह्यांच्या बेजाबदार कारभाराबाबत उपसभापती शरद शिगवण यांनी धारेवर धरले असता शिगवण ह्यांनी माफी मागून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.पंचायत समितीच्या आवारात पंचायत समिती सभागृह व शिक्षण विभागचे स्वतंत्र इमारत असताना गट शिक्षण अधिकारी शिगवण ह्यांनी संबधीत शिक्षकांना आवारात प्रश्नपत्रिका वितरण करण्याचे आदेश का दिले ह्याबाबत आश्चर्य व संताप व्यक्त केला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या