खैर लाकडांच्या खरेदी-विक्रीचा पैसा दहशतवादी संघटनांना पुरवला जात असल्याच्या संशयावरून चिपळूण तालुक्यातील सावर्डे-दहिवली येथे दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) धाड टाकून सहाजणांना अटक केली आहे. सोमवारी त्या सर्वांची पोलीस कोठडी संपताच त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी वसीम अख्तर मुक्तार अहम मोमीन (78, इस्लामपूर मस्जीद जवळ, इस्लामपूरा, भिवंडी-ठाणे), असिफ रशिद शेख (नगरसूल, नाशिक), फारूख शेरखान पठाण (येवला रोड, नाशिक), शाहनवाज प्यारेजन (बल्लापूर, कर्नाटक), ईशाद युसूफ शेख (संगमनेर, अहमदनगर) तर स्थानिक असलेला मुआज रियाज पाटणकर (अडरेकर मोहल्ला, सावर्डे-चिपळूण) अशी अटक असलेल्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.