अहो, ऐकलंत का? चितळ्यांचे दुकान दुपारीही सुरू राहणार!

50

प्रतिनिधी । मुंबई

पुण्यातील चितळ्यांच्या बाकरवड्या खुसखुशीत आहेत, पण चितळ्यांचे दुकान दुपारी १ ते ४ पर्यंत बंदच असते. यावरून बाकरवडीसारखेच खुसखुशीत विनोद गेली कित्येक वर्षे जगभर फिरत आहेत. आता मात्र चितळ्यांनी… अहो, ऐकलंत का? आमचे दुकान दुपारीही सुरू राहणार! अशी बातमी दिली आहे.

सुधीर गाडगीळ यांनी ठाण्यात चितळ्यांशी दिलखुलास गप्पा मारल्या. त्यावेळी इंद्रनील चितळे यांनी घोषणा केली… १ जुलैपासून पुण्यातील डेक्कनचे दुकान दुपारी सुरू राहील (टाळ्या). मात्र बाजीराव रोडवरील दुकान दुपारी सुरू ठेवायचे की नाही याचा विचार करू, कारण सुरू ठेवले तर मग आम्ही चितळे चर्चेत कसे राहणार! (हशा).

आपली प्रतिक्रिया द्या