चितळेंची बाकरवडी जगात भारी, सर्वोत्तम 150 मिठाई केंद्रांमध्ये पुण्याची कयानी बेकरीही

पुण्यातील खाद्यपदार्थांचा डंका आता जगभरात वाजला आहे. टेस्ट अॅटलास या आंतरराष्ट्रीय फूड गाईडने जगभरातील टॉप 150 मिठाई केंद्राची यादी जाहीर केली आहे. यात पुण्यातील चितळे बंधू आणि कयानी बेकरीचा समावेश आहे.
चितळे बंधू हे बाकरवडीसाठी तर कयानी बेकरी ही त्यांच्या मावा केकसाठी प्रसिद्ध आहेत.

आईस्क्रीम सॅण्डविचसाठी मुंबईतील के रुस्तम अॅण्ड पंपनीने या यादीत 49 वे स्थान पटकावले आहे. पहिल्या स्थानावर लिस्बनमधील रूआ डी बेलेम असून तेथील प्रसिद्ध मिठाई पेस्टल डी बेलेम आहे.