चित्रांगदा सिंग झळकणार छोट्या पडद्यावर

सामना ऑनलाईन । मुंबई

हजारो ख्वाहिंशे ऐसी, ये साली जिंदगी, इन्कार अशा चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी अभिनेत्री चित्रांगदा सिंग ही आता छोट्या पडद्यावर झळकणार आहे. ती एका इंग्रजी वाहिनीच्या फूड शोमध्ये झळकणार असल्याचं वृत्त आहे.

इंग्रजी जीईसी चॅनेल एएक्सएनने पुढील महिन्यामध्ये सुरू होणाऱ्या फूड शोसाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री चित्रांगदा सिंगची निवड केली आहे. मेरिएट इंटरनॅशनल ही जगातील सर्वात मोठी हॉस्पिटॅलिटी शृंखला आणि एएक्सएन इंडिया ही इंग्रजी मनोरंजनपूर्ण शो सादर करणारी वाहिनी यासाठी एकत्र आली आहे. या सहयोगाच्या माध्यमातून एका पाककला शोची निर्मिती करण्यात येणार आहे.

चित्रांगदाने अन्न‍ व पोषणामधील पदवी शिक्षण घेतलं असून आणि एक अभिनेत्री म्हणून तिच्यात असलेले अष्टपैलूत्व, मोहकता व ग्लॅमर यांमुळे तिला या कार्यक्रमासाठी निवडण्यात आले आहे. हा सहयोग चित्रांगदासाठी इंग्रजी जीईसी क्षेत्रातील पहिला अनुभव असेल. अभिनेत्री व निर्माती चित्रांगदा सिंगने आपलं मनोगत व्यक्त केलं. ती म्हणाली की, ”आपल्या जीवनामध्ये अन्न अत्यंत महत्वाचे आहे आणि मेरिएटचे शेफ्स अगदी आगळ्यावेगळ्या चवीचे पदार्थ बनवतात. मला नेहमीच पाककला, आपली संस्कृती आणि जगभरात प्रवास करण्याबाबत रुची राहिली आहे. याच आवडीने मला विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी दिली आहे. मेरिएट व एएक्सएनसोबतचा हा प्रकल्प जगातील सर्वोत्तम पाककलेचा आस्वाद घेण्याची एक संधी आहे. कोण म्हणतं काम हे मजेशीर व स्वादिष्ट असू शकत नाही.” हा कार्यक्रम पुढील महिन्यापासून एएक्सएन वाहिनीवर दिसणार आहे.

summary- chitrangada singh to be a part of food show