चॉकलेट फेशिअल

61

डॉ. अप्रतिम गोयल

चॉकलेट फेशियल हा त्वचा तजेलदार करण्याकरिता एक नवीन ट्रेण्ड सध्या बाजारात सुरू आहे. फेशियलसोबतच फेस पॅक, मॉइश्चरायझिंग क्रिम, क्लिन्झर्स, वॅक्स याकरिता चॉकलेटचा वापर करतात. चॉकलेटमध्ये जास्त प्रमाणात ऍण्टी ऑक्सिडंट असतात तसेच ते कोकोपासून तयार केले जाते. कोकोमधील ऍण्टी ऑक्सिडंट गुणधर्मामुळे त्वचेला उजळपणा येऊन त्वचेचे सूर्यकिरण आणि धुळीपासून रक्षण होते.

तेलकट त्वचा

दही, चॉकलेट आणि बारीक केलेली लिंबाची साल एकत्र करून मिश्रण तयार करावे. हा पॅक चेहरा आणि मानेला ३० मिनिटे लावावा.

रुक्ष, कोरडी त्वचा

२ चमचे चॉकलेट पावडर, १ चमचा मध, ४ चमचे दूध एकत्र करून त्याची पेस्ट तयार करावी. चेहऱयाला वाफ द्यावी त्यानंतर तयार केलेला मास्क लावावा.

ग्लोइंग, ब्लेमिश त्वचा

चॉकलेट पावडर आणि संत्र्याचा रसाची पेस्ट तयार करावी. गुलाब पाण्याने चेहरा स्वच्छ पुसून घ्यावा. तयार केलेली पेस्ट चेहरा, मानेला २० मिनिटे लावावी.

ऍण्टी एजिंगकरिता

एका बाऊलमध्ये अंडय़ाचा पिवळा बलक, २ चमचे चॉकलेट पावडर एकत्र करावी. त्यानंतर चेहऱयाला वाफ देऊन तयार केलेला फेशियल पॅक चेहऱयाला २० मिनिटे लावावा.

चॉकलेट फेशियल कसे करतात ?

चॉकलेट स्क्रब, चॉकलेट पेस्ट आणि नंतर मास्क वापरून चेहऱयावरील टॅन दूर करतात.

याकरिता प्रथम चेहरा क्लिन्झरचा वापर करून क्लीन करतात.

त्यानंतर कोको पावडरने स्क्रब करून डेड स्किन काढली जाते. यामुळे त्वचा मुलायम होते.

कोको पावडरपासून तयार केलेल्या कोको पेस्टमध्ये मध किंवा बटरचा वापर करून चेहऱयाला १५ मिनिटे मसाज केला जातो. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवावा.

त्यानंतर विटॅमिन इ आणि दुधाचा वापर करून तयार केलेले चॉकलेट फेसमास्क चेहऱयाला लावले जाते. १५ मिनिटांनी मास्क वाळल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवून चेहऱयाला आपल्या आवडीप्रमाणे टोनर लावावा.

कोरडी, रुक्ष किंवा तेलकट अशा त्वचेच्या प्रकाराप्रमाणे चॉकलेट फेशियल केले जाते. विशेष म्हणजे याकरिता साध्या तापमानात चॉकलेट वितळवून घेणे गरजेचे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या