इथे केला जातो चाकूने मसाज..

37

सामना ऑनलाईन । ताइपेइ

दिवसभर थकून भागून घरी आल्यानंतर थकवा जाण्यासाठी अनेक जण मसाजचा आधार घेतात. मसाज करून घेणं शरीरासाठी आवश्यक आहे. पण तैवानमध्ये एक विशेष मसाज पार्लर आहे जिथे चक्क चाकूने मसाज केला जातो. गंमत म्हणजे गेल्या ३० वर्षांपासून ह्सियाओ मेई फांग या नावाची एक महिला हे चाकू मसाज पार्लर चालवते.

फांग हिच्या म्हणण्यानुसार, हा मसाजचा प्रकार २५०० वर्षांपूर्वीचा असून चीन हे त्याचं उगमस्थान आहे. एकाच वेळी दोन चाकू वापरून हा मसाज दिला जातो. त्यामुळे माणसाच्या शरीरात उर्जानिर्मिती होते. या मसाजची सुरुवातीची किंमत ३० पौंड म्हणजे सुमारे २५०० रुपये इतकी आहे. या मसाजमध्ये जे चाकू वापरले जातात, ते नेहमीचे धारदार चाकू नसतात. ते अत्यंत सुरक्षित असतात. पण, त्यांचा आकार मात्र एखाद्या चॉपरसारखा असतो.

गंमत म्हणजे हा भयानक वाटणारा मसाजचा प्रकार तैवानमध्ये तुफान लोकप्रिय आहे. तैवानच्या अनेक नागरिकांना या मसाजनंतर शरीराच्या अनेक दुखण्यांच्या तक्रारी दूर झाल्याचे अनुभव आले आहेत.
पाहा या मसाजचा व्हिडिओ-

आपली प्रतिक्रिया द्या