श्रीदत्तस्थान -चोरघड

1622

जळगाव जिल्हय़ात पारोळे नावाचे तालुक्याचे ठिकाण आहे. ते मुंबई-नागपूर या मार्गावर असून पारोळय़ापासून अवघ्या आठ मैलांवर चोरघड हे दत्त क्षेत्र आहे. हे स्थान अत्यंत जागृत आहे. दत्ताचे देऊळ एका मळय़ात आहे. चोरघड येथील दत्तात्रेयांची मूर्ती एकमुखी व द्विभुज आहे. महानुभावपंथाच्या लोकांनी या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली असून ती अतिप्राचीन आहे.

‘महानुभावियांचा दत्त’ म्हणूनच हे दत्तस्थान विशेष प्रसिद्ध आहे. दत्तमंदिराचे पुजारीही महानुभावीयच आहेत. या ठिकाणी दत्त जयंतीचा उत्सव मोठय़ा प्रमाणात होतो. प्रत्येक गुरुवारीही उत्सव होत असतो.

आपली प्रतिक्रिया द्या