छोटा शकीलच्या दुसऱ्या बहिणीचे कोरोनाने निधन, एका महिन्यात दोन्ही बहिणींचा मृत्यू

1574

कुख्यात गुंड छोटा शकील याची बहीण हमिदा हिचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्याने तिचा मृत्यू झाला आहे. मुंब्र्यातील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. गेल्या महिन्यात छोटा शकीलची लहान बहीण फहमिदा शेख हिचा मृत्यू झाला होता. एका महिन्याच्या आत छोटा शकीलच्या दोन बहिणींचा मृत्यू झाला आहे.

शकीलची मोठी बहीण कुठे राहाते याचा पत्ता लागू शकलेला नाहीये, त्याच्या लहान बहिणीचा म्हणजे फहमिदाचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला होता. तिचीही कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. फहमिदा ही मीरारोडला राहात होती आणि तिचा नवरा जमिन खरेदीविक्रीचा व्यवसाय करतो. बहिणीच्या मृत्यूनंतर शकीलने तिचा नवरा आरीफ याच्याशी फोनवरून बोलणं केलं होतं असं कळतं आहे.

छोटा शकील हा मुंबईत एक ट्रॅव्हल एजन्सी चालवत होता. 1980 साली त्याने दाऊद इब्राहीमसोबत हातमिळवणी केली होती. दाऊदचा तो एकदम खासमखास मानला जात होता. तपास यंत्रणांना संशय आहे की दाऊदचा सगळा कारभार सध्या छोटा शकीलच सांभाळतो. 1988साली शकीलला अटक करण्यात आली होती, मात्र त्याला नंतर जामीन मिळाला होता. जामिनावर सुटताच शकील दुबईला पळून गेला. 1993 साली दाऊद आणि शकीलने मिळून मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले होते.

आपली प्रतिक्रिया द्या