टी-२० क्रिकेटमध्ये ख्रिस गेलचा नवा विक्रम

28

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आपल्या तडाखेबाज फलंदाजीसाठी ओळखला जाणारा वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. टी-२० क्रिकेटमध्ये ८०० षटकार ठोकण्याचा पराक्रम गेलने केला आहे. असा पराक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.

बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये ढाका येथे खेळल्या गेलेल्या लढतीत रंगपूर रायडर्सकडून खेळताना त्याने हा विक्रम केला आहे. या सामन्यात त्यान ५१ चेंडूत १२६ धावांची खेळी केली, यामध्ये ६ चौकार आणि १४ षटकारांचा समावेश होता. गेलच्या नावावर आता ३१८ टी-२० सामन्यांत ८०१ षटकारांची नोंद आहे. त्यात १०३ षटकार त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत लगावले आहेत.

गेलनंतर टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार वेस्ट इंडिजचाच किरोन पोलार्ड (५०६), न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्युलम (४०८), वेस्ट इंडिजचा ड्वेन स्मिथ (३५१) आणि ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर (३१४) यांनी ठोकले आहेत. गेलने टी-२० मध्ये १९ शतकं झळकावले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या