आंतरराष्ट्रीय नाणेनिधी प्रमुखांची सूचना, महिलांच्या सुरक्षेकडे मोदींनी लक्ष द्यावे!

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

आठ वर्षांच्या मुलीवरील बलात्काराची घटना घृणास्पद आहे असे सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांवरील अत्याचारांकडे, त्यांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टिन लेगार्ड यांनी व्यक्त केली.

महिलांवरील अत्याचारांकडे मोदी यांच्यासहीत त्यांच्या देशाच्या यंत्रणेतील सर्वच अधिकाऱयांनी लक्ष देण्याची गरज आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. मोदी मागील वेळी दावोस येथे आले होते. तिथे त्यांचे भाषण झाले पण त्यांच्या भाषणात महिलांचा पुरेसा उल्लेख नव्हता याची आठवण करून देतानाच ही गोष्ट आपण त्यांच्या लक्षात आणून दिली होती, असेही क्रिस्टिन लेगार्ड यांनी नमूद केले आहे.