चुनाभट्टीच्या इंग्रजी शाळेने पटकावले जेतेपद

35

चुनाभट्टी

शिवाजी क्रिकेट क्लब व शिवाजी क्रीडा संवर्धन समिती, चुनाभट्टी यांच्या वतीने महानगरपालिका एल वॉर्डातील शालेय मुलांकरिता आयोजित केलेल्या ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत चुनाभट्टीच्या इंग्रजी शाळेने जेतेपदाला गवसणी घातली. हिंदी माध्यमाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शिवसेनेच्या नगरसेविका व बाजार उद्यान समितीच्या अध्यक्षा सान्वी विजय तांडेल यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माजी नगरसेवक मच्छिंद्र कचरे, विजय तांडेल या मान्यवरांची उपस्थिती होती. या स्पर्धेत आठ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा शिवाजी क्रिकेट क्लबचे अध्यक्ष अरुण वारंग, पन्हाळे मॅडम यांच्या हस्ते पार पडला. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सुभाष देशमुख यांनी अथक परिश्रम घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या