भूखंडाचा वापर बदलण्यास सिडकोने दिली मंजुरी; नवी मुंबईत उद्योगधंद्यांना उभारी मिळणार

2699

भूखंडाचा वापर बदलण्यास आणि भूखंडधारकांनी केलेल्या मागणीनुसार अतिरिक्त चटईक्षेत्र (एसआयएस) देण्यास सिडकोने मंजुरी दिली आहे. सिडकोच्या या निर्णयामुळे नवी मुंबईत उद्योगधंद्यांना उभारी मिळणार आहे.

नवी मुंबईत सिडकोने वाटप केलेल्या भूखंडांचा वापर निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे या भूखंडांच्या वापरात भूखंडधारकांना बदल करता येत नाही. ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील एमआयडीसीमध्ये अनेक केमिकल कंपन्यांच्या जागेवर आयटीपार्क उभे राहिले आहे. तेथे जसा भूखंड वापरात बदल झाला तसाच बदल करण्याचे धोरण आता सिडकोने घेतले आहे. संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत भूखंड वापर बदल आणि अतिरिक्त चटई क्षेत्राचे धोरण तयार करण्यात आले आहे.

व्यावसायिकांची पिळवणूक थांबणार
भूखंडाचा वापर बदलाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. ती गांभीर्याने घेऊन सिडकोने हा निर्णय घेतला आहे. शाळा-महाविद्यालय, भाजीपाला मार्केट, वैद्यकीय सेवा यासाठी दिलेल्या भूखंडांच्या वापरात मात्र कोणताही बदल होणार नाही. निवासी भूखंडाचा वाणिज्य वापर करण्यासाठी बदल करता येणार आहे. ज्या भूखंडांना एकचा एफएसआय आहे. त्या भूखंडांना मागणीनुसार अतिरिक्त एफएसआय देता येणार आहे, असे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या