हिंदुस्थानातून गाशा गुंडाळणार ‘सिटी बँक’, 25 लाख ग्राहकांचे काय होणार? वाचा…

अमेरिकेचा बहुराष्ट्रीय बँकिंग आणि वित्तीय सेवा गट सिटी ग्रुप हिंदुस्थानातून आपला गाशा गुंडाळण्याची तयारी करत आहे. गुरुवारी सिटी बँकेने हिंदुस्थानी ग्राहक बँकिंग व्यवसायातून बाहेर पडण्याची घोषणा केली. यानंतर बँक खातेदार आणि क्रेडिट कार्डधारकांचे काय होईल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, SBI आणि इतर अनेक खासगी बँक आता सिटी बँकेचा क्रेडिट व्यवसाय खरेदी करणार आहेत. ज्या बँकेकडे हा व्यवसाय जाईल, तीच बँक यापुढे सिटी बँकेच्या 25 लाख ग्राहकांना सुविधा देणार आहे. सिटी बँकेचे व्यवसाय SBI खरेदी करणार, अशी शक्यता बाजारात वर्तवली जात असताना BSE मध्ये SBI कार्ड शेअर 7.5 टाक्यांनी वाढला आहे.

ग्राहकांनी चिंता करू नये

बँक बदलल्यास सिटी बँकेच्या विद्यमान ग्राहकांना फारसा फरक पडणार नाही. जी बँक सिटी बँकेचे व्यवसाय खरेदी करणार त्याच बँकेशी ग्राहक ही जोडले जातील. नवीन बँक स्वतः आपली पॉलिसी तयार करेल आणि त्यानुसार ग्राहकांना सुविधा देतील. सिटी बँकेने म्हटले आहे की, जोपर्यंत कोणतीही रिटेल बँक आमचे व्यवसाय घेत नाही, तोवर आम्ही आमच्या ग्राहकांना सेवा पुरवत राहू.

आपली प्रतिक्रिया द्या