City Of Dreams मध्ये आदिनाथची सरप्राईज एण्ट्री!

सिटी ऑफ ड्रीम्स’चा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सध्या एका व्यक्तिरेखेची जोरदार चर्चा आहे ती म्हणजे महेश आरवलेची. ही व्यक्तिरेखा आदिनाथ कोठारे याने साकारली असून त्याच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक होत आहे. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या कोणत्याही पोस्टर, टिझर किंवा ट्रेलरमधून ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर आणली गेली नव्हती. ती व्यक्तिरेखा प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज होते. त्याची ही सामाजिक नेत्याची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावत आहे.

‘सिटी ऑफ ड्रीम्स’मधील व्यक्तिरेखेविषयी तो म्हणतो, ‘‘सिटी ऑफ ड्रीम्समधील महेश आरवलेची व्यक्तिरेखा प्रेक्षकांसाठी एक गुपित होते. हे गुपित प्रेक्षकांना आवडत आहे याचा आनंद नक्कीच आहे. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळे एक प्रकारची ऊर्जा मिळते तसेच अजून उत्तम काम करण्याचा हुरूप येतो.’’ आगामी काळात आदिनाथ ‘83’, ‘पाणी’, ‘पंचक’ यांसारख्या आगामी चित्रपटांमधून दिसणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या