आता सायकलनेच प्रवास करण्याची वेळ, दिल्लीतील प्रदूषणामुळे सरन्यायाधीश हैराण

cji-sharad-bobade

राजधानी दिल्लीतील प्रदूषणाने आणि विषारी हवेने भयानक पातळी गाठली आहे. या प्रदूषणाला केवळ शेजारच्या राज्यांत जाळले जाणारे शेतातील धान्य कापणी केल्यावर उरलेले तण  (पराली) हेच एकमेव कारण नाहीय.त्याला वाढत्या वाहनांचा धूर आणि अन्य कारणेही आहेत असे पर्यावरण तज्ञ सांगतात.तसे असेल तर आपण सर्वांनी चकाकणाऱया कार आणि मोटारसायकल सोडून आता सायकलने अथवा पायी चालण्याची वेळ येऊन ठेपली आहे, अशी परखड टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी दिल्लीतील प्रदूषणावरील याचिकेवरील सुनावणीप्रसंगी आज केली.

दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरातील हवा प्रदूषणाने अतिशय विषारी झाली आहे. या हवेने नागरिकांचा श्वास घोटू लागला आहे. या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आता कठोर पावले उचलण्याची वेळ आली आहे, असे सांगून सरन्यायाधीश बोबडे म्हणाले, केवळ पराली जाळल्यामुळेच दिल्ली आणि एनसीआरची हवा विषारी झालेली नाही. सोबत दिल्लीतील वाहनांची प्रचंड संख्या आणि काही कारखान्यांमधून सोडला जाणारा धूरही कारणीभूत आहे. अशा स्थितीत आपण दिल्लीत सायकलनेच अथवा पायी प्रवास करण्याची वेळ नक्कीच आली आहे. पण आपण ते करणार नाही हे तितकेच खरे आहे.

वायू प्रदूषणाने पुणी आजारी पडला तर सरकारच जबाबदार – खंडपीठ
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपण्णा आणि न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठापुढे दिल्लीतील भयावह प्रदूषणविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. पेंद्र सरकारने राजधानी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरातील प्रदूषण रोखण्यासाठी कठोर दंड ठोठावणारा वटहुपूम जारी केला आहे, असे पेंद्राच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यावर वायू प्रदूषणामुळे यापुढे पुणी आजारी पडले तर आम्ही सरकारलाच जबाबदार धरू असे खंडपीठाने पेंद्र आणि राज्य सरकारला सुनावले. याप्रकरणाची पुढील सुनावणी 6 नोव्हेंबरला होणार आहे. पर्यावरणविषयक कठोर नियम अथवा प्रतिबंध पाळले नाहीत तर राजधानी दिल्लीचे भवितव्य धोक्यात आहे एवढे मात्र निश्चित.

आपली प्रतिक्रिया द्या