सीकेपी सोड्यांची खिचडी

तांदूळ अर्धा तास धुवून ठेवावेत आणि सोडे भिजत घालावेत. सोड्यांचे छोटे तुकडे करून घ्यावेत. त्यांना हळद, तिखट, मीठ, आले-लसूण पेस्ट, गरम मसाला, मीठ लावून, लिंबू पिळून किंवा चिंचेचा कोळ घालून १० मिनिटे ठेवावे. तव्यात तेल तापवुन त्यात हिंग, थोडा कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये मसाला लावून ठेवलेले सोडे नीट परतून घ्यावेत. दुसऱ्या भांडयात तेल तापवून त्यात लवंग, दालचिनी, हळद, तिखट, गरम मसाला ,मीठ टाकून त्यात उरलेला कांदा गुलाबी रंगावर परतावा. त्यावर तांदुळ टाकून तेही परतून घ्यावेत. २ ते ३ मिनिटांनी त्यावर तव्यातील सोडे टाकावेत नीट परतावे. मग त्यात तांदळाच्या अंदाजानुसार पाणी घालून भात नीट शिजू द्यावा. खिचडी शिजली की त्यावर कोथिंबीर आणि खवलेले खोबरे घालावे.

आपली प्रतिक्रिया द्या