चिनी माकडांचे पितळ उघड, ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

32

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थान आणि चीनमध्ये डोकलाम भागामध्ये तणावाचे वातावरण असताना चिनी सैनिकांनी लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात घुसखोरीचा प्रयत्न केला होता. लडाखमधील या भागामध्ये घुसखोरीचा दावा चीनकडून फेटाळण्यात आला होता. मात्र पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनकांच्या घुसखोरीचा व्हिडिओ समोर आला असून ‘मी नाही त्यातला…’ म्हणणाऱ्या चीनचे पितळ उघडं पडलं आहे. व्हिडिओमध्ये हिंदुस्थान आणि चीनच्या सैन्यामध्ये धक्काबुक्की आणि दगडफेक झाल्याचे स्पष्ट दिसत असून मागे पँगाँग सरोवराचा काही भाग दिसत आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या (१५ ऑगस्ट) दिवशी सकाळी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांनी लडाखमध्ये घुसखोरीचा अयशस्वी प्रयत्न केला होता. सीमेवर जागता पहारा देणाऱ्या हिंदुस्थानच्या जाबाज जवानांच्या सतर्कतेमुळे चीनच्या घुसखोरीचा डाव उधळण्यात होता. त्यावेळी हिंदुस्थान आणि चीनचे सैन्य आमनेसामने आले होते. दोन्ही बाजूंनी करण्यात आलेल्या दगडफेकीत काही जवान जखमी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या