मुंबई-हैदराबादमध्ये वानखेडेवर दंगल

45

सामना ऑनलाईन,मुंबई

दोन वेळचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सने हार्दिक पंडय़ा व नितीश राणा या युवा खेळाडूंच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर वानखेडे स्टेडियमवर झालेल्या लढतीत हातातून निसटणारा विजय कोलकाता नाइट रायडर्सकडून खेचून आणला. या सणसणीत विजयामुळे सलामीच्या लढतीत पुणे सुपरजायंटकडून स्वीकाराव्या लागणाऱ्या पराभवाला रोहित शर्माच्या ब्रिगेडने लीलया मागे टाकले. मात्र मुंबई इंडियन्ससमोर उद्या मुंबईत होणाऱ्या आयपीएल लढतीत सलग दोन लढतींत विजय मिळवणाऱ्या गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादचे आव्हान असणार आहे. यावेळी एकीकडे रोहित शर्माचा यजमान मुंबई इंडियन्सचा संघ घरच्या मैदानावर सलग दुसऱ्या विजयाला गवसणी घालण्यासाठी जीवाचे रान करताना दिसेल, दुसरीकडे डेव्हिड वॉर्नरचा सनरायझर्स हैदराबादचा संघ विजयाची हॅटट्रिक साधण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल.

काँटे की टक्कर

दोन्ही संघांमध्ये स्टार खेळाडूंची कमी नाहीए. मुंबई इंडियन्समध्ये रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हरभजन सिंग, लसिथ मलिंगा, हार्दिक पंडय़ा, कायरॉन पोलार्ड यांसारखे सामन्याला क्षणार्धात कलाटणी देणारे खेळाडू आहेत. गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादमध्ये डेव्हिड वॉर्नरसह युवराज सिंग,शिखर धवन, मोयसेस हेन्रीक्स, आशीष नेहरा, भुवनेश्वरकुमार, केन विल्यमसन ही मंडळी आहेत. त्यामुळे उद्या होणारी दोन संघांमधील लढत ही काँटे की टक्करच असेल असे म्हणायला हरकत नाही.

 

आपली प्रतिक्रिया द्या