एका रात्रीत नितळ त्वचा!

सामना ऑनलाईन । मुंबई

बऱ्याचदा एखाद्या कार्यक्रमाला जाण्याचा उत्साह असतो… पण चेहऱ्यावर अचानक येणारी मुरुमे, पुटकुळ्या… यामुळे हा उत्साह विरून जातो. हे मुरूम हटवण्यासाठी महागड्य़ा क्रीम वापरल्या जातात, पण घरगुती उपायही फायदेशीर ठरतात.

– चंदनाच्या पावडरीत थोडेसे गुलाबपाणी मिसळून त्याची पेस्ट बनवून चेहऱ्याला लावा. चंदनाचे लाकूड असेल तर ते सहाणेवर उगाळा. उगाळण्यासाठी गुलाबपाण्याचे काही थेंब सहाणेवर टाकून चंदन उगाळा. ही पेस्ट मुरुमांवर लावा. रात्रभर सुकू द्या. सकाळी चेहरा स्वच्छ धुवा.
– एक चमचा हळदीमध्ये मध, दूध आणि काही गुलाबपाणी टाकून त्याची पेस्ट तयार करावी. या पेस्टमध्ये थोडासा कोरफडीचा गर टाकून फेसपॅक तयार करा. हा पॅक चेहऱ्यावरील मुरमे आलेल्या ठिकाणी लावा. १५ मिनिटांनी चेहरा धुवा.
– अर्धा टोमॅटो कापून त्याचा रस काढा. रसातील आम्लता कमी होण्यासाठी त्यात थोडं पाणी घाला. रात्रभर हा रस लावून दुसऱ्या दिवशी चेहरा धुवा.

आपली प्रतिक्रिया द्या