Video – गाडीच्या चाकात अडकलेल्या तरुणीला फरफटत नेले, पाहा त्या घटनेचे धक्कादायक फुटेज

दिल्लीत नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला गाडीखाली आलेल्या तरुणीला गाडी चालकाने गाडीसोबत चार किलोमीटरपर्यंत खेचत नेल्याने तिचा मृत्यू झाला आहे. चार किलोमीटरपर्यंत फरफटत गेल्याने त्या तरुणीच्या अंगावरचे सर्व कपडे फाटले होते व ती विवस्त्र अवस्थेत रस्त्याच्या कडेला लोकांना आढळून आली. सदर तरुणीने या घटनेच्या तासाभरापूर्वीच तिच्या आईला फोन करून ती घरी येत असल्याचे कळवले होते. या प्रकरणातील पाचही नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे. नुकताच या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून गाडीच्या चाकाखाली मुलगी स्पष्ट दिसत आहे.