कुत्र्याने घेतला बर्फात स्केटिंगचा आनंद

77

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सध्या जगभरात कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीत एकदा तरी हिमाच्छादित प्रदेश फिरायला जावे, तेथे बर्फात स्केटिंग करावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. अशीच स्केटिंग करण्याची इच्छा चक्क एका कुत्र्याला झाली आणि क्षणार्धात त्याने ती इच्छा पूर्णही केली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात राहणारी एक मुलगी आपल्या कुत्र्यासोबत हिमाच्छादित प्रदेशात फिरायला गेली होती. इतर लोक स्केटिंग करताना पाहताच कुत्र्यालाही स्केटिंग करण्याचा मोह आवरला नाही आणि त्याने चक्क प्लास्टिकच्या तुकड्याच्या सहाय्याने स्केटिंग केली. कुत्र्याचा बर्फात स्केटिंग करण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दीड लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या