पार्श्वभागावर प्रेयसीचं नाव लिहताना ग्राहक Xगला, टॅटू कलाकाराने सांगितला अत्यंत गलिच्छ अनुभव

अमेरिकेतील लॉस एंजलिसमधील टॅटू काढणाऱ्या कलाकाराने त्याच्या आयुष्यातील अत्यंत गलिच्छ घटनेबद्दल सांगितलं आहे. ग्राहक कसे विचित्र असतात आणि ते काहीही करतात याबद्दल क्रोकोडाईल जॅक्सनने सांगितलं आहे. टीकटॉकवरील एका व्हिडीओमध्ये त्याने या प्रसंगाबद्दल सांगितलं आहे. आपल्यासोबत त्या दिवशी जे काही झालं, त्यावर आपला अजूनही विश्वास बसत नसल्याचं जॅक्सनने म्हटलंय.

जॅक्सनने घटनेबद्दल सांगताना म्हटलंय की एके दिवशी एक मुलगा आला आणि म्हणाला की मला टॅटू काढायचा आहे. त्याला त्याची प्रेयसी मेघन हिचं नाव पार्श्वभागावर रंगवायचं होतं. जॅक्सनने कामाला सुरुवात केली. काम अर्ध्यावर आलेलं असताना जॅक्सनला डोळ्याच्या कोपऱ्यातून काहीतरी दिसलं. ग्राहकाच्या पार्श्वभागाच्या कपारीतून काहीतरी बाहेर येत असल्याचं जॅक्सनला दिसलं. काही सेकंदात तो ग्राहक माझ्यासमोर Xगला असं जॅक्सनने सांगितलं. घडल्या प्रकारामुळे मी ग्राहकावर जाम भडकलो होतो असं जॅक्सनने सांगितलंय. मात्र ग्राहकाने यावरही त्याला स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. त्याने सांगितलं की कामावरून मी थेट इथे आल्याने मला संडासाला जाता आलं नव्हतं. हा सगळा प्रकार झाल्यानंतर जॅक्सननने टॅटू पूर्ण केला का तो अर्धवट राहिला, हे मात्र कळू शकलं नाही.