देशात उष्णतेची लाट, महाबळेश्वर मात्र गारेगार

mahabaleshwar-cold-wave

सामना ऑनलाईन । महाबळेश्वर

देशात तापमानाचा पारा चढला असतानाच महाबळेश्वरसह सातारा परिसरात अचानक वातावरणात गारवा आला आहे. हवामानात झालेल्या बदलामुळे महाबळेश्वरला फिरायला आलेल्या पर्यटकांना धुक्यातलं महाबळेश्वर आणि सह्याद्रीच्या पर्वत रांगा पाहायला मिळत आहेत. उन्हाळ्यातही असं अल्हाददायक वातावरण आणि हे सुंदर दृष्य पर्यटकांना आकर्षून घेत आहे.