माझा मित्र

 

अश्विनी शेंडे

जवळचा मित्र जयदीप बगवारकर (माझा नवरा)

त्याचा पॉझिटिव्ह पॉईण्ट माझी चिडचिड, काळजी मी त्याला सांगते तेव्हा तो शांतपणे ऐकून घेतो, समजून घेतो.

निगेटिव्ह पॉईण्ट तो पटकन निर्णय घेऊ शकत नाही.

त्याच्यातली आवडणारी गोष्ट त्याचा आवाज खूप छान आहे आणि त्याच्या गालाला पडणारी खळी मला खूप आवडते.

त्याच्याकडून मिळालेले आतापर्यंतचे बेस्ट गिफ्ट गिफ्ट बऱयाचदा मीच देते. त्याने मला एकदा पंचमदांची सीडी दिली होती.

त्याच्याकडून काय शिकलात – शांत कसं राहायचं ते शिकले. तो कोणतंही काम जबाबदारीने करतो.

एकमेकांसाठी वेळ देता का? हो ठरवून आम्ही भेटतोच.

त्याची आवडती डिश सुरमई फ्राय, कोळंबी बिर्याणी.

तो डिस्टर्ब असतो तेव्हा एकमेकांकडे टेन्शन शेअर करतो.

त्याच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण मी त्याच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण अविस्मरणीयच असतो.

तू चुकतेस तेव्हा तो काय करतो मी चुकते तेव्हा अत्यंत शांतपणे तो माझी चूक मला दाखवतो आणि तो चुकतो तेव्हा मी खूप आरडाओरड करून त्याची चूक त्याला दाखवते.

दोघांचे भेटण्याचे ठिकाण? घरी किंवा आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जेवताना आम्ही गप्पा मारतो.

भांडण झाल्यावर काय करता? एकमेकांना सॉरी म्हणतो.

दोघांपैकी जास्त राग कोणाला येतो? मला.

त्याचे वर्णन तो पूर्वीपासूनच खूप शांत आहे. तो खूप छान गातो. आम्हाला दोन वर्षांची मुलगी आहे. तिलाही तो खूप व्यवस्थित सांभाळतो.