राजस्थान : मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

1940

राजस्थानमध्ये गेल्या एक महिन्यापासून राजकीय गोंधळ सुरू होता. बंडखोर नेते सचिन पायलट हे गेहलोत यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारला धक्का देण्याच्या तयारीत होते. मात्र मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा अनुभव आणि पक्षावरची पकड इतकी मजबूत होती की पायलट यांचं बंड त्यापुढे थंड पडलं. अखेर सचिनने पायलट यांनी कॉंग्रेससोबत समझोता केला आणि राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. अशोक गेहलोत यांनी सरकारला अडचणीतून बाहेर काढले.

राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. आवाजी मतदानाद्वारे ठराव पारित करण्यात आला. यानंतर कॉंग्रेसच्या आमदारांमध्ये आनंदाची लहर दिसून आली. त्याचवेळी राजस्थानमध्ये हे सभागृहाचे कामकाज 21 ऑगस्टपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या