Live – फोडाफोडीचं राजकारण करत सत्ता स्थापन करणार नाही – देवेंद्र फडणवीस

2827

 • महायुती तुटलेली नाही, आम्ही युती तुटलीय असं म्हटलेलं नाही. केंद्रात आम्ही एकत्र आहोत
 • सत्ता स्थापन करण्यासाठी फोडाफोडीचं राजकारण करणार नाही.
 • आमदार फोडण्याचे जे आरोप होत आहेत त्यांना मी खुलं आव्हान देतो की त्यांनी पुरावा सादर कराव. नाहीतर माफी मागावी.
 • नवीन निवडणूका लागू होण्यापेक्षा सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू
 • ते सांगतील तोपर्यंत मी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून हा कारभार सांभाळणार आहे.
 • कुठलाही धोरणात्मक निर्णय मला घेता येणार नाही.
 • मी राजीनामा दिल्यानंतर राज्यापालांनी मला काळजीवाहू मुख्यमंत्री राहण्यास सांगितले आहे
 • हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी पूजनीय आहेत. आम्ही त्यांच्याविरोधात कधीच बोललो नाही.
 • गेल्या पाच वर्षात माझे उद्धवजींशी चांगले संबंध होते. आम्ही अनेक चर्चा केल्या.
 • या संदर्भात जे काही समज गैरसमज झाले असतील ते चर्चेतून सोडवणं शक्य होतं. मात्र शिवसेनेने आम्ही चर्चाच करणार नाही अशी भूमिका घेतली
 • कदाचित तो फ़ॉर्म्युला अमित शहा किंवा उद्धव ठाकरे यांच्यात झालेला असेल तर मला माहित नाही.
 • माझ्यासमोर अडीच वर्षाचा विषय निर्णय झालेला नव्हता.
 • आम्ही स्पष्ट केलं होतं की महायुतीचं सरकार येईल
 • आमचे सर्व पर्याय खुले आहेत, हे त्यांनी का म्हटलं असा प्रश्न आमच्यासमोर आला.
 • निकाल आले त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं की सरकार बनविण्याचे सर्व पर्याय खुले आहेत.
 • जे काम आम्ही केलं त्या कामाची पावती महाराष्ट्राच्या जनतेने दिली.
 • भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला
 • आम्ही महायुती म्हणून विधानसभेला सामोरे गेलो. जनतेने आम्हाला निवडणूकीत संपूर्ण बहुमत, प्रचंड यश दिलं.
 • महाराष्ट्रासमोर खूप समस्या आहेत. गेल्या पाच वर्षात प्रचंड मोठं काम झालं आहे.
 • गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होते ते सर्व प्रोजेक्ट मार्गी लावले. शहर गावांमध्ये झालेला विकास हा विलक्षण आहे
 • चार वर्ष दुष्काळाची व एक वर्ष अतीवृष्टीचं आहे. मात्र आम्ही त्यांच्या मागे उभे राहिलो. जलयुक्त शिवारसारखी योजना यशस्वीपणे राबविली
 • महाराष्ट्रामध्ये आलेल्या संकटांचा सामना आम्ही समर्थपणे केला.
 • आमच्या सोबत असलेला मित्रपक्ष शिवसेना आणि त्यांचे नेते यांचे आभार मानतो.
 • आमचे नेते आदरनीय मोदीजी, अमित शहा, प्रकाश नड्डाजी, माझे सर्व नेते, कार्यकर्ते, पाच वर्ष माझ्यासोबत काम करणाऱ्यांचे आभार
 • महाराष्ट्राच्या जनतेने सेवा करण्याची संधी दिली त्यासाठी जनतेचे आभार
 • माननीय राज्यपालांना भेटून माझा राजीनामा सादर केला असून तो राज्यपालांना स्वीकारला
 • देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोहोचले
 • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यापालांकडे आपला राजीनामा दिला आहे.

महाराष्ट्र निवडणुकीचा निकाल लागून 15 दिवस झाले. तरी अद्याप सत्ता स्थापनेचा तिढा अजून सुटलेला नाहिये. त्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साडे चार वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. मुख्यमंत्री फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या