कर्नाटकात काँग्रेसची आश्वासनपूर्ती, सिद्धरामय्या सरकारचे जाहीरनाम्यातील 5 लोककल्याणकारी योजनांवर शिक्कामोर्तब

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कॉँग्रेसने पाच लोककल्याणकारी योजना राबविण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सत्तेत येताच पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेतला होता. शुक्रवारी झालेल्या बैठकीत निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनांची 11 जूनपासून पुर्तता करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

कर्नाटकात सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वातील कॉँग्रेस सरकारने सखी शक्ती, गृह ज्योती, अन्न भाग्य, गृह लक्ष्मी, युवा निधी या पाच लोककल्याणकारी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. 11 जून ते 15 ऑगस्टपर्यंत यामधील चार योजनांचा लाभ प्रत्यक्षात मिळण्यास सुरुवात होईल. तर युवा निधी योजनेसाठी पदवीधर आणि पदवीकाधारक बेरोजगार युवकांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत.

योजना काय आहेत

सखी शक्ती ः याअंतर्गत कर्नाटकातील महिलांना राज्य परिवहन बसमधून राज्यात कुठेही मोफत प्रवास करता येईल.

गृह ज्योती ः  याअंतर्गत घरगुती ग्राहकांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे.

अन्न भाग्य ः या अंतर्गत सर्व बीपीएल कार्डधारकांना प्रति व्यक्ती 10 किलो धान्य दिले जाईल.

गृह लक्ष्मी ः ही योजना 15 ऑगस्टपासून लागू होणार आहे. या अंतर्गत कुटुंबातील महिला प्रमुखाला दरमहा 2 हजार रुपये मिळणार आहेत.