बाबासाहेब आंबेडकर यांचे परळमधील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक होणार, मुख्यमंत्र्याची घोषणा

2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबासाहेबांच्या परळ येथील निवासस्थानाला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे हे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज परळमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. बाबासाहेब आंबेडकर हे परळमधील बीआयटी चाळीतील इमारतीत दुसर्‍या माळ्यावर राहायचे, त्यांनी 1912 ते 1934 या कालावधीत 22 वर्षे या निवासस्थानी वास्तव्य केले होते. त्यांच्या निवासस्थानाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला हार घातला. त्यानंतर त्यांना हे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसीत करू अशी घोषणा देखील यावेळी केली.

आपली प्रतिक्रिया द्या