मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

1854

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सनई-चौघड्यांचे मंजुळ स्वर, तुतारी आणि ढोल ताशांचा निनाद, भगव्या पताका, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या जयघोषात किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला.

‘गोरगरिबांच्या मनात हे माझे सरकार आहे अशी भावना निर्माण झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी शासन कटिबद्ध राहील. शिवनेरी या आपल्या वैभवाचा वारसा जतन करण्यासाठी आवश्यक प्रयत्न केले जातील’, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले. तसेच यावेळी शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी 23 कोटी रुपयांच्या निधीची करण्यात आली.

shivneri-1

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यानिमित्त शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याने भगव्या पताका व ध्वजांनी जुन्नर परिसर भगवामय झाल. जागोजागी स्वागत कमानी उभारल्या असून छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा, शिवजन्मस्थळ, पंचायत समिती, नगरपालिका इमारतीसह सर्व शासकीय इमारतींना विद्युत रोषणाई करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या