मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट

1659

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज भवन येथे सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री ठाकरे विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी रश्मी ठाकरे, राजशिष्टाचार व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व मुख्य सचिव अजोय मेहता हे देखील उपस्थित होते.

img-20200518-wa0015

तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह बिनविरोध निवड झालेल्या 9 सदस्यांनी सोमवारी दुपारी सदस्यत्वाची शपथ घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, काँग्रेसचे राजेश राठोड, भाजपचे रणजित सिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांनी आज शपथ घेतली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ

आपली प्रतिक्रिया द्या