लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले आहे. मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

अभिवादन संदेशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, लोकशाहीर अण्णा भाऊंनी स्वातंत्र्यसंग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान दिले आहे. कष्टकरी, कामगार आणि शेतकऱ्यांच्या व्यथावेदनांना शब्द आणि आवाज देतानाच त्यांनी चळवळीत चैतन्य जागवले. अस्सल मराठी मातीतील त्यांच्या साहित्याने सातासमुद्रापार ओळख निर्माण केली. महाराष्ट्र सुपुत्र साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊंना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अण्णा भाऊ साठे यांना आदरांजली वाहिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या