मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा; अजित पवार, फडणवीस, राज ठाकरे उपस्थित

9496

राज्यातील कोरोना परिस्थिती संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विधिमंडळातील विरोधी पक्ष नेते तसेच इतर सर्व प्रमुख राजकीय पक्ष नेते यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. दुपारी 2 च्या सुमारास व्हिडीओ कॉन्फरन्स सुरू झाली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात उपस्थित होते. तर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रकाश आंबेडकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, जोगेंद्र कवाडे, विनय कोरे, महादेव जानकर, जयंत पाटील, इम्तियाज जलील, अशोक ढवळे, कपिल पाटील, राजेंद्र गवई आदी नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व नेत्यांना मुद्दे मांडण्याची संधी दिली. विविध नेत्यांनी आपले मुद्दे मांडले.

आपली प्रतिक्रिया द्या