मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ

4291

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज सोमवारी विधानभवन येथे विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर यांनी त्यांना सदस्यत्वाची शपथ दिली. शपथविधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह बिनविरोध निवड झालेल्या 9 सदस्यांनी सोमवारी दुपारी सदस्यत्वाची शपथ घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, काँग्रेसचे राजेश राठोड, भाजपचे रणजित सिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांनी आज शपथ घेतली.

तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडून विधानपरिषद सदस्य म्हणून निवडीचे प्रमाणपत्र स्वीकारले. यावेळी सौ. रश्मी ठाकरे, सचिव राजेंद्र भागवत आदि उपस्थित होते.

img-20200518-wa0009

आपली प्रतिक्रिया द्या